सुखाचा शोध
सुखाचा शोध


कळीचे फुल झाले न मजला कळले.
माय-बापाच्या सावलीत जीवन बहरले.
माझ्याच शोधात सुख येत होते तेव्हा.
मागायचे काय? हेच कळत नव्हते तेव्हा.
संस्काराचा माझा साचाच होता वेगळा.
शिकले सवरले पण जगता येईना मजला.
वय वाढू लागले अन तेव्हा कळले मजला.
सुखाच्या शोधात मी, अर्थ उमगला.
माय-बापांच्या गळचा सुटावा एक फास.
मागच्यांची व्हावी लग्न म्हणून चढले बोहला.
नोकरी करणारीच वधू हवी फॅशन आली तेव्हा.
नोकरी सोड बोलणारे भेटले दैवाने मजला.
चिकट,संशयी,पुरातनकाळचा तो नवरा.
सुखाच्या शोधात मी तळमळले तेव्हा.
सहनशक्तीचा अंत होत सोसत जगले जेव्हा.
होईल माय -बाबांस त्रास सांगितले नाही केव्हा.
लग्न होऊन भाऊ राहू लागला वेगळा.
बाबाना ह्दयाचा झटका भेट दिलास रे तेव्हा.
दोन मुलांच्या संसाराने माय-बाबांची दैना.
हव्यासामुळे ऋणानुबंध दम तोडतो जव्हा.