STORYMIRROR

Mita Nanwatkar

Abstract Drama Tragedy

3  

Mita Nanwatkar

Abstract Drama Tragedy

सुगंधी जखमा

सुगंधी जखमा

1 min
135

अल्लड अवखळ कशा

माझिया सुगंधी जखमा

अंतरंगी दरवळताना का

बाळगत नाही त्या तमा

थोड्या आहेत हळव्या

पण तितक्याच संयमीत

वर्दळीत हसून मुक्याने

जपतात हृदयातले मीत

एकांतातील धुंद संगत

अन् गर्दीतले पोरकेपण

अलवारपणे गोंजारतात

खचलेले हे माणुसपण

चंचल या भावभावनांना

घेतात आपल्या मिठीत

काजव्यांपरी विहरतात

रम्य आठवांच्या कुपीत

हुंदक्याच्या तालावरती

घालतात खूप धिंगाणा

कधीकधी अबोल राहून 

साधतात गुढ निशाणा

आसवांनी कुरवाळतात

नजरेतील कोवळी प्रीत

मनपटलावर रेखाटतात

जीवनाची अनोखी रीत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract