STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Romance

2  

Meenakshi Kilawat

Romance

सुगंधाचे दान

सुगंधाचे दान

1 min
13.6K




तनमन पावसात भिजुनिया

उल्हास शब्दावाचून मी भोगला

सूर सुगंधी मातीचा मृदगंध

सुगंधाचे दान दिला जनाला,

ऋतु हिरवा ऋतु बरवा भावला..


प्रितीत फुलली माझ्या

आकाशातील जणू मेघश्याम

भरूनी दानस्वरुप सुगंध

झालाया प्रेमाला परागशिंपण,

ऋतु हिरवा ऋतु बरवा भावला..


स्वच्छ सुगंध हिरव्या मळ्यात

लाल,हिरवा,पिवळा बाणा

दिसती जिकडे तिकडे मज

मोती,माणिक,पाचू सजणा,

ऋतु हिरवा ऋतु बरवा भावला..


मधुर रसमय पाऊस हा अद्भूत

त्रिभूवन दरवळतो गंधाराने

सरीता ही मदमस्त वाहती

निसर्ग देतो दान सुगंधाचे भरूनी,

ऋतु हिरवा ऋतु बरवा भावला..


मद्या वाचुन चढवी मनात धुंदी

फुलावाचुन करे वायू सुगंधी

सुगंध वेढतो कणाकणाला

पाश नसे परी करितो बंदी,

ऋतु हिरवा ऋतु बरवा भावला...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance