सुचावी जशी कविता
सुचावी जशी कविता
तुला पाहता.
मंद व्हावा सुवास केवड्याच्या तू जाता जाता
पौर्णिमेच्या चंद्राचे पसरले तेज टिपूर
चांदण्याचा प्रकाश सरता सरता
तूही अलगद भिडवलीस नजर
हळूच इशारा करता करता
दिनरात्रीचे मज भान न उरले आता
तू आलीस समोर की काहूर मनी
सुगन्ध रातरणीचा दरवळता
सुचावी जशी कविता
तुला पाहता.

