सत्तांतर
सत्तांतर
प्रेम आटलें, आटला श्रुंगार
सभोवताली प्रेताचाच अंगार
जिवंतपणी माणसें झाली प्रेत
स्वतःचा ऑक्सीजन स्वतः
मिळवायचा आहे
सर्व व्यवस्थाच ऑक्सिजन वर आहे
सगळेच मृत्यू पाहुन आले आहेत
माणसाच्या मनात जागा नाही,
स्मशानभूमीत जागा नाही
सामूहिक विवाह सोहळे नाही
आता सामूहिक अग्नीसंस्कार होत आहेत
मुले आता बागडत नाहीत
मलमली तारुण्य आता कोणी पांघरत नाही
संध्याछाया आता भिववित नाही हृदया
बालपण करपले, तारुण्य तरसलें, वार्धक्य तडपलें
प्रत्येक श्वास आता विषाणू ठरवणांर
देवांनाही बंदिस्त करून,
आता विषाणूंनी केली आहे सत्ता काबीज
