स्त्री
स्त्री
देवाने एक रोपटे लावले ह्या जगात ....
नाव त्या रोपट्याचं ठेवलं मुलगी नारी, स्त्री ,महिला ,कन्या ह्या रूपात ....
ते रोपटं खितळू लागल बागडू लागल..
आईच्या मायेच्या सावलीत वाडु लागलं...
पण जस जस वाडु लागलं तसं तिला कळू लागलं
ह्या जगात मुलीच्या नशिबी भोगावे लागतात जरा जास्त त्रास ....
असं म्हणतात की स्त्रिया लवकर रडतात ...
पण तिच्या सहनशक्तीपुढे कोणीच नाही धरू शकत तिचा हात ...
दुसऱ्याचा सुखासाठी ती राबते ...
आपल्या मात्र आवडी निवडी ला बाजूला सारते ...
तिच्या अस्तित्वाला आहे खूप मोठ म्हणत्व .....
तिच्या शिवाय नाही होत कुठलं पूर्ण नातं ...
तिच्यात आहेत निरनिळ्या अभिनयाची छटा ...
सालस बाई तून अत्याचारात लढण्यासाठी बनू शकते ती दुर्गामाता ....
केवढ छोटं नशीब तीच राहावं लागत
थोडेच दिवस आईच्या छत्रात ...
नवं नाव नवीन ओळख नवी लोकात मिसळावं लागत नव्या सुनेच्या रूपात
हळू हळू आई मग सासुच्याही भूमिकेत भरावे लागतात रंग त्या रूपात
ती एक देवाची देणगी आहे तिच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे ..
शब्द वाक्य कमी पडतील असं आहे तीच महतव ....
जुलूम करणाऱ्यांनो तिच्या पुढे नाही तुमचं अस्तित्व ...
तिचा आदर करा प्रेमाने वागावं
तरच ती येईल लक्ष्मीच्या रूपात ...
.
