Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shobha Wagle

Abstract Tragedy Thriller

3  

Shobha Wagle

Abstract Tragedy Thriller

स्त्री स्वातंत्र्य कोठे!!

स्त्री स्वातंत्र्य कोठे!!

1 min
181


आज स्त्रीला स्वातंत्र्य मिळाले

म्हणत असतील दुनिया सारी

पण स्त्रीच जाणते ते स्वातंत्र्य

बेगडी ते संसारात तिला भारी


मेंहदीचे पाय गृहलक्ष्मी घराची

नवरीच्या पायी पैंजण सोन्याचे

बेड्या दुसऱ्या पायी रिवाजांच्या

बंधन असे तिला मुक्त जगण्याचे


शिक्षण घेऊनी शिक्षित झाली

तरी पुरातन संस्कृतीत दबली

मुक्त वावर करण्यास विसरली

रिती-रिवाजांच्या कारणा फसली


मुलगा हवा वंशाला दिवा म्हणून

गर्भातच मुलीला मारतात नराथम

मुलगा मुलगी दोष तिचा नसतोच

शिक्षित असूनही कळत नाही सम


दोन घरांचे संबंध जोडणारी लेक

आई -बाबा, सासू -सासऱ्यांची काठी

स्वतः तेवते दोन्हीकडे करुनी कसरत

तिच असते सदा आम्हा वृद्धापाठी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract