जोडा निसर्गाशी नाते
जोडा निसर्गाशी नाते
दिसला सर्प की
लागता त्याच्या पाठी
असो विषारी की बिनविषारी
हातात घेता काठी
वाघ मारायचा
मर्दुमकीसाठी
हरिण अस्वल
त्यांच्या कातडीसाठी
दुर्मिळ प्राण्यांची निर्यात
पाठवता त्यांना परदेशात
तुमच्या स्वार्थासाठी
चार पैशांसाठी
हे सारे आहेत निसर्ग
साखळीतले दुवे
जीवसृष्टी टिकवण्यासाठी
सगळेजण हवे
प्रेम करा पशुपक्ष्यांवर
प्रेम करा झाडाझुडपांवर
शूट करा पण कॅमेराने
बहरू द्या निसर्गाला
पशु पक्ष्यांच्या किलबिलाटाने
बहरू दे ही वसुंधरा
घनदाट होऊ देत जंगले
जोडा निसर्गाशी नाते तर
परिणाम दिसतील चांगले
