एकदा तरी
एकदा तरी
उज्ज्वल भवितव्यासाठी
दूर परदेशी तू गेलास खरी,
पण जीवात जीव नसतो
तूझ्या आईचा घरी.
'आई मी मजेत आहे, काळजी करू नकोस'
हे सांगायला तू एकदा तरी
फोन उचलशील का...?,
दोन मिनिटं वेळ काढून
'आई तू कशी आहेस'
एकदा तरी तिला विचारशील का...?
आता, मैत्री जमली असेल तुझी
नवीन मित्र-मैत्रिणी सोबत छान,
पण तुझ्याच जुन्या सवंगडींची तू
एकदा तरी आठवण काढशील का...?
दारीं येऊन हाक देतात तुझ्याचं नावाने
'आलीच रे पोरांनो...' म्हणून आई येताच,
ते बिलगतात तिला मायेने.
आईच्या या मायेच्या ओढीने, तू
एकदा तरी व्याकुळतेने येशील का...?
खूप वाट बघतोय आम्ही सारे,
फोन नाही तर निदान पत्राद्वारे तू
एकदा तरी काही कळवशील का...?
