सुंदर स्वप्नपरी
सुंदर स्वप्नपरी
आहे एक सुंदर परी ,
माझ्या स्वप्नात बसलेली ...
समोर नाही पण ,नेहमीच
माझ्या हृदयात असलेली ...
मन झुरते माझे ...
बोलणे नाही झाले तर ,
मनच लागत नाही कुठे ...
अशी कशी मनात
घर करून गेलीस तू ...
हृदयात न विसरणारी ,
सुखद जखम केलीस तू ...
तुझ्याविण जगणे अधुरे वाटे
झुळूक लाजरी येते
अन स्वप्न वेलीवर झुलते ..
सांज सावली येते
अन उगीच धडपड होते ..
देना चाहूल साजणी
आज भाव मनी हा दाटे...
येशील का तू सांग एकदा
तुझ्यावीण जगणे अधरे वाटे ... ..
