STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract

मरण

मरण

1 min
233

वाटोळे कधीच कुणाचं नाही केलं

केलं मनातून प्रत्येकाचं भलं,

त्यांनीच दिले दाखवून त्यांचे गुण

मागतात देवाला माझं ते मरण.


साऱ्यांनीच केली त्या उपकाराची फेड,

शेवटी आपणच ठरलो वेडं,

कळला नाही कुणाच्या मनातला डाव

आपणच आपल्या दोष नशिबाला द्यावं.


अजून ही करतो अपेक्षा

मनातून सर्वांच्या भल्याची,

त्यांनी मात्र वाटच पहावी

जरुर माझ्या मरणाची..


मरताना ही एकच

मागण मागेन देवाला,

त्या लोकांच्या खुशीसाठी

तू दे रे देवा मरण मला..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract