स्त्री शक्ती
स्त्री शक्ती
चूल आणि मुल सांभाळणे
नाही नारी अबला,
स्वतःचा निर्णय स्वतः घेते
आहे नारी सबला
आहे ती खूप खंबीर
असे तिच्यात स्त्रीशक्ती,
विचार मांडते स्वच्छंदी
आहे महिला नारीशक्ती
आठवून सावित्रिंचे विचार
चालू त्यांच्या वाटेने,
कधीच हार नाही मानणार
ध्यास आहे ध्येय गाठणे
आजची स्त्री कशी असावी
असावी उंच आकाश,
पक्षी बनून आकाशी
घडवेल ती विकास
