स्टोरीमिरर व हिरकणी साहित्य से
स्टोरीमिरर व हिरकणी साहित्य से
जागतिक महिला दिना निमित्त स्टोरीमिरर व हिरकणी साहित्य समूह यांच्या संयुक्त विद्यमाने हिरकणी कथा,कविता व चारोळी लेखन उपक्रम. प्रसिद्ध कवयित्री व समाजसेविका काशीकन्या वनश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शना नुसार संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवण्यात येत आहे .महाराष्ट्रासह देशातील महिलांचे विविध क्षेत्रातील स्थान, विविध क्षेत्रातील महिलांची उल्लेखनीय कामगिरी त्याच बरोबर विविध क्षेत्रात महिलांवर होणारे अत्याचार ,अन्याय या सर्व विषयाला अनुसरून महिला दिना निमित्त फक्त महिलांसाठी राष्टीय स्तरावरील विशेष उपक्रम.
अध्यात्मिक काळातील स्त्रिया
झाल्या संत महिला,
त्यांच्या भक्ती भावाने
बोध , विचार दिले सर्वांना.
संत मुक्ताबाई यांनी
रचीले "दाटीचे" अभंग,
त्यांच्या अध्यात्मिक सामर्थ्याने
चांगदेवाचे गर्व झाले भंग.
दळीता आणि कांडीता
नाम मुखी विठ्ठलाचे,
करी आपुली राखण
अभंग संग जनाबाईचे.
स्त्रियांविषयीच्या भावना
सोप्या भाषेत सांगितल्या,
संतवाणी त्यांच्या
आजही जीवित राहिल्या.
