आध्यात्मिक संत महिला (चारोळी)
आध्यात्मिक संत महिला (चारोळी)
पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन
आध्यात्मिक काळातील झाल्या संत महिला,
त्यांचे गोड बोध, आचार, विचार
भक्तीचा सागर दिला सर्वांना.
.................................................
स्त्री जन्माला आली म्हणून
का होता उदास?,
स्त्रीच असते घराचा पाया
स्त्री वाढवणे हाच ध्यास
..................................................
प्रसिद्ध होत्या संत जनाबाई यांच्या ओव्या
जात्यावर दळताना बोलायच्या ओव्या,
शेण्या -गौऱ्या वेचताना मुखी विठूचे नाम
वात्सल्य, स्त्रीविषयांच्या भावना होत्या ओव्या.
