चारोळी
चारोळी
(१)
स्वातंत्र्यपूर्व काळातील स्त्रियांनी
न्यायासाठी केल्या चळवळी,
विधवा पुनर्विवाह, स्त्री हत्या, सती जाने
बंद केली प्रथा यांनी.
(२)
सावित्री फुलेंनी दगड , शेणाचा मार खाऊन
महिलांसाठी लढल्या धैर्याने,
कधीही हार मानली नाही
शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली त्यांनी.
(३)
झाशीच्या राणीने इतिहास घडविला
ब्रिटिशांशी धडसिने लढून,
स्त्रियांच्या मनात ऊर्जा निर्माण केली
देशप्रेम आणि बलिदान करून.
(४)
दूध विकायला गडावर जायच्या हिरकणी
गुरांच्या दुधावर उदरनिर्वाह व्हायचे कुटुंबांचे,
झाले सर्व बंद दरवाजे गडाचे
बाळाला भेटण्या साठी रक्तबंबाळ झाले त्यांचे.
(५)
जिजाऊ मातेने तलवार शिकवली
छत्रपती शिवाजी महाराज यांना,
रामायण , महाभारत,राजकारण,डावपेच
योद्ध्याचे महात्म्य दिले राजांना.
