STORYMIRROR

Rupali Pawar

Others

3  

Rupali Pawar

Others

स्टोरीमिरर व हिरकणी साहित्य से

स्टोरीमिरर व हिरकणी साहित्य से

4 mins
239

जागतिक महिला दिना निमित्त स्टोरीमिरर व हिरकणी साहित्य समूह यांच्या संयुक्त विद्यमाने हिरकणी कथा,कविता व चारोळी लेखन उपक्रम. प्रसिद्ध कवयित्री व समाजसेविका काशीकन्या वनश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शना नुसार संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवण्यात येत आहे .महाराष्ट्रासह देशातील महिलांचे विविध क्षेत्रातील स्थान, विविध क्षेत्रातील महिलांची उल्लेखनीय कामगिरी त्याच बरोबर विविध क्षेत्रात महिलांवर होणारे अत्याचार, अन्याय या सर्व विषयाला अनुसरून महिला दिना निमित्त फक्त महिलांसाठी राष्टीय स्तरावरील विशेष उपक्रम.


 आध्यात्मिक संत महिला


   आपल्या भारत देशात खूप संत होऊन गेले. अशा संतांच्या खांदाला खांदा देऊन उभ्या राहणाऱ्या काही महिला देखील संत होऊन गेल्या आहेत. अध्यात्मिक काळातील संत महिला होऊन गेल्या आहेत. अशा या अध्यत्मिक महिलांना विसरून कसे चलेल त्यांचे बोध त्यांचे विचार या सर्वांचा विसर पडला आहे.चला तर मग पाहूया अजून जाणून घेऊया अध्यात्मिक संत महिला काय करत होत्या . त्यांचे विचार,आचार, बोध सर्व जागे करूया .

       

        संत ज्ञानेश्वर यांची धाकली बहीण स्त्री संत मुक्ताबाई यांचा उल्लेख तर तुम्हाला माहीतच असेल. 

"| स्त्री जन्म म्हणुनी |न व्हावी उदास||"

याचा अर्थ स्त्री , महिला , मुलगी यांचा जन्म झाला म्हणून उदास का होता? यात उदास होण्याचं करणाच नाही आहे असे त्यांनी म्हटले आहे. आई पाहिजे, बहीण पाहिजे , बायको पाहिजे मग मुलगी जन्माला का नको . त्या साठी संत मुक्ताबाई यांनी मुलगी झाली तर उदास नको होऊ बोलतात. संत मुक्ता बाईंनी रचलेले दाटीचे अभंग ''४२'' प्रसिद्ध आहेत. संत मुक्ताबाई यांचा भाऊ संत ज्ञानेश्वर यांनी दरवाजा बंद करून आत बसले होते. ते दरवाजा उघडण्यासाठी विनंती केली. छोट्याशा मुक्ताबाई यांचा अलौकिक ज्ञान पाहून योगी चांग देवाचा अहंकार गळून पडला.त्यांनी मुक्ताबाई यांना आपले गुरू मानले.मुक्ताबाई यांनी "ज्ञानबोध" असे ग्रंथ ही लिहिले आहेत. मुक्ताबाई यांनी आपल्या पेक्षा मोठ्या भावांना मायेची पारख दिली. त्यांना आई सारखं सांभाळल. सर्व संतांनी संत मुक्ताबाई यांचा " ज्ञानाधिकार" मान्य केला. मुक्ताबाई यांनी बालपणीच त्यांच्या समाजाचे उग्र कठोर अनुभवले आणि ते पचवून लौकिक जीवन संघर्षाकडे पाठ फिरवली. मुक्ताबाई यांच्या वाणीत सांसारिक सुख दुःखाचा व क्लेश पिडांचा सामवेश नाही. त्यांनी त्यांचे जीवन अलौकिक रंगात रमवून टाकले. मुक्ताबाई यांच्या काव्यात जीवनाचे अनेक पैलू उठून दिसतात. त्यांच्या अभंगांत "योगाच्या" खुणा आहेत.त्यांच्या अभंगांत आध्यात्म्याची उंची आहे. साक्षात्काराचे पडसाद आहेत. त्यांना भावनेची हळूवार ताही आहे .त्यांनी भावना खूप सोप्या पद्धतीने सांगितल्या आहेत .


    संत जेणे व्हावे |

    जग बोलणे साहावे ||१||

    तरीच अंगी थोरपण |

    जया नाहि अभिमान ||२||

    थोरपण जेथे वसे |

     तेथे भूतदया असे ||३||

     रागे भरावे कवणारी |

     आपण ब्रह्मसर्वदेशी ||४||

     ऐशी सम दृष्टी करा |

     ताटी उघडा ज्ञानेश्वरा ||५||


याचा अर्थ संत त्याने व्हावे जे जग बोलेल मग ते चांगल असो की वाईट ते सहन करण्याची क्षमता असावी . लोक म्हटलं की चांगल्यातून पण वाईट शोधत असतात अशा लोकांजवळ लक्ष न देता त्यांचं बोलणं हसत सहन करावं.अंगी कितीही कला असली तरीही कोणत्याही गोष्टीचा अभिमान बाळगू नये. जिथे थोरपण असेल तिथे भूतदया असणारच . राग हा का यावा ? आणि कोणावर रागवाव? सर्व आपलीच आहेत मग का रागवायच . असे आपण चांगलं पाहा मनात ,राग ,क्लेश, द्वेष सर्व बाजूला सारून अस लक्ष केंद्रित करा ताटी उघडा ज्ञानेश्वर .असे हे अभंग बोलून संत ज्ञाेश्वरांना ताटी उघडायला सांगतात. त्यांची छोटी बहीण असून संत मुक्ताबाई यांनी त्यांच्या मोठ्या भावाला समजावून सांगितलं आहे. 

     असेच साधे सोपे आणि सरळ भाषेत संत मुक्ताबाई यांनी आपले अभंग लिहिले आहेत मन हेलकावून घेणारे आहेत .


       संत मुक्ताबाई यांच्या सारख्याच अजुन एक संत होऊन गेल्या ,संत जनाबाई ह्या . संत जनाबाई ह्या खूपच लोकप्रिय संत होत्या. त्यांच्या ओव्या खूपच प्रसिद्ध आहेत. अजूनही संत जनाबाई यांच्या ओव्या जीवित आहेत. पूर्वी खेड्यातील लोक दळण जात्यावर दळायच्या . त्या दळण दळताना संत जनाबाई यांच्या ओव्या बोलायच्या. जानाबई यांचे आई पंढरीच्या विठुरायाचे परम भक्त होते.ते नेहमी पंढरीची वारी करायचे. त्यांच्या आई वडिलांनी संत जनाबाई यांना दामाजी शेठ शिंपी यांच्या पदरात टाकले. त्या स्वतःला "नामयाई दासी"असे म्हणवून घेत असत. संत जनाबाई विठ्ठलाच्या परमभक्त होत्या . त्यांच्या आई वडील यांच्या प्रमाणेच.त्यांनी भाकरीचा ध्यास घेतला होता."संत नामदेव "हे त्यांचे गुरू होते."दळीता आणि कांडीता तुझे नाम घेईन विठ्ठला" हे त्या म्हणत असतं. त्यांच्या मुखी विठ्ठलाचे नामस्मरण असे. 

   

 "विठू माझा लेकुरवाळा| सगे गोपाळांचा मळा ||"

   

      हा प्रसिद्ध अभंग संत जनाबाई यांचा आहे. त्यांना संत नामदेव यांच्या मुळे "संत -संग" घडला. गौऱ्या शेन्या वेचताना व घरातील इतर काम करताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत. त्यांचे एकूण "३५०" अभंग आहेत. हे अभंग मुद्रित केले आहेत. त्यांचे अभंग भगवंतांच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण भावना विसरून त्या विठ्ठलाच्या चरणी शरण गेलेल्या आहेत. तशीच वेळ आली तर त्या देवाशी पण भांडायला कमी करत नसायच्या . दे सोबत पण त्यांचं भांडण व्हायचं. वात्सल्य , कोमल ,ऋतुजा, सहनशीलता, त्यागी वृत्ती,समर्पण वृत्ती, स्त्रि विषयीच्या भावना ,संत जनाबाई यांच्या काव्यात दिसून येतात . संत जनाबाई यांनी येणाऱ्या सर्व पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्व सामान्य माणसाच्या हृदयी जाऊन भिडते . त्यांनी लोकांना सोप्या व सरळ भाषेत संत वाणी समजावून सांगितली. देवावर अतूट श्रद्धा त्याने त्यांच्या अभंगातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड केली. 


    नाम विठोबाचे घ्यावे |

     मग पाऊल टाकावे ||१||

     नामे तारक हे थोर |

     नामे तरिले अपार ||२||

     अजामेळा उद्धारीला |

     चोखामेळा मुक्तीस नेला ||३||

     नाम दळनी मांडणी|

     नामयाची जनी ||४||


संत जनाबाई सांगतात विठोबाचे नाव घेऊन कोणतेही कार्याला सुरुवात करावी . कुठेही जायचं असेल तर पाहिलं विठोबाचे नाव तोंडी असावे. तोच आपला कर्ता धर्ता आहे . तोच आपल्याला तारणार आहे. दळता मांडता नाम घ्यावे आणि काम करताना पण मुखी विठुरायाचे नाम स्मरण असावे . अशा प्रकारे संत जनाबाई यांनी देवाचे नामस्मरण कसे करायचे व भक्तीत किती ताकद असते हे सांगितले आहे .


     अशाप्रकारे आध्यात्मिक काळातील महिलांनी संत होऊन सर्वांना देवाच्या नावात किती ताकत असते हे दाखवून दिले . त्यांच्या मुखातून एक एक शब्द देवाचे नामस्मरण करत होते. चराचरात आणि मनामनात फक्त देव भक्ती होती . ते त्यांनी लोकांपर्यंत पोहचवली आज त्यांची संत वाणी अख्या दुनियेत प्रसिद्ध आहे . धन्य ती संत वाणी आणि धन्य त्या संत महिला .


Rate this content
Log in