स्टोरीमिरर व हिरकणी साहित्य से
स्टोरीमिरर व हिरकणी साहित्य से
स्टोरीमिरर व हिरकणी साहित्य सेवाभावी संस्था आयोजित....जागतिक महिला दिना निमित्त स्टोरीमिरर व हिरकणी साहित्य समूह यांच्या संयुक्त विद्यमाने हिरकणी कथा,कविता व चारोळी लेखन उपक्रम.
प्रसिद्ध कवयित्री व समाजसेविका काशीकन्या वनश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शना नुसार संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवण्यात येत आहे .महाराष्ट्रासह देशातील महिलांचे विविध क्षेत्रातील स्थान, विविध क्षेत्रातील महिलांची उल्लेखनीय कामगिरी त्याच बरोबर विविध क्षेत्रात महिलांवर होणारे अत्याचार ,अन्याय या सर्व विषयाला अनुसरून महिला दिना निमित्त फक्त महिलांसाठी राष्टीय स्तरावरील विशेष उपक्रम.
प्राधान्य नोकरीला का घराला.
घर सांभाळून नोकरी करते
आजची कर्तुत्ववान स्त्रि,
पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन
पुढे चालली आजची स्त्रि.
पहिल्या महिला राष्ट्रपतीने
देश सांभाळला धाडसी ने,
ती पण होती नारीशक्ती
संदेश दिला धैर्याने
कधी बनून अन्नपूर्णा
पोट भरते सर्वांचे,
घेऊनी आकाशी झेप
रूप घेते पक्षाचे.
फक्त चुल आणि मूल सांभाळणे
नाही अत्ता नशिबी,
अत्ता असे दृढ निःश्वास
मनी नित्य धाडसी.
