करा मुलींचे स्वागत
करा मुलींचे स्वागत
1 min
241
स्त्री भ्रूणहत्या करू नका
करा मुलींचे स्वागत,
अशी जनजागृती करा की
दुनिया राहील बघत.
करुनी नवस देवीला
मागता मुलगी पोटी,
ती पण आहे नारीशक्ती
विसरता जाऊन मुलाच्या आहारी.
उच्च पदवी घेऊन स्त्रिने
गाठली उंच दिशा,
मुलगीच असते पाया
मुलगीच असते आशा.
देऊ मुलीला जन्म
मुलीला मोठं करू,
मुलगी वाचवून
मुलीच्या जन्माचे स्वागत करू.
