स्त्री शिक्षण " माय "
स्त्री शिक्षण " माय "
माय कस मी "शिकू"मले समजत नाय,
बाप म्हणे लय झाल आता इले उजवून टाकI
माय म्हणे मले ही समाजाची रित हाय
माय कस मी 'शिकू'शिकून रितभात काय जात नाय
बाप म्हणे मले शिकून उजव'न' रहात नाय
माय म्हणे मले समाजात मले रहावत मायI
माय कस मी "शिकू"मले समजत नाय,।
बाप म्हणे वयान तीन तीसी गाठली हाय
शरीराची भूक जाता जात नाय I
माय कस मी "शिकू"मले समजत नाय,
डॉक्टरम्हणे मले वीसीतच उतम आयपन हाय,
माय या बाईपनले 'मी' उबगले मी न माय,
माय कस मी "शिकू"मले समजत नाय,
नवरा तर ऐकत नाय लग्नाचा अर्थ मले समजत नाय,
माय सासू दिवस मोजत म्हणे तुले कळत कस नाय।
माय कस मी "शिकू"मले समजत नाय,
बहिण म्हणे, जरा दमान, मैत्रीण म्हणे जरा जोमान,
मले काय समजत नाय ,
माय म्हणे तुला कळत कस नाय "गेले"दिवस हेच बायपन हाय,
माय कस मी "शिकू"मले समजत नाय,
शिकून सन मायपन-बायपन "गेल्या" शिवाय जात नाय ,
माय कस मी "शिकू"मले समजत नाय,
माय झाले पण मायपण माय झाल्याशिवाय कळत नाय।
