स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
अनंतशा कालौघात तिचं दुःख वहातंय...
ना कुणाला तमा , ना कुणाला खंत.
कधी कुणी थोपटतंय....दुःख सुकतंय.
कधी कुणी खुपसतंय.....दुःख भळभळतंय........
सासरी गेली तरी.... धास्तावलेलीच ती.
कधी फ्लॅट ....कधी .....सोनं
नित्य नवी मागणी.
असं अनाहूत संकट तिच्या
सहनशक्तीचा अंत बघतं
अशा हिंस्त्र लालसेला जाळावं , पुरावं वाटतं.......
एकतर्फी प्रेमात तिच्या बिचारीचा काय दोष?......
गुंड , मवाल्यांच्या प्रेमाला झुगारल्याने रोष.
कुणी क्रूरपणे जागच्या जागी जाळून टाकी......
तर कुणी अंगावर आम्ल फेकी.
किती सोसायचं, किती गिळायचं , तुम्हीच सांगा....
माझं स्त्रीत्वं हाच का माझा गुन्हा ??
कधी येईल खरी समानता?
मनात तर नुसता विचारांचा गुंता!!
मला कुणी योग्य उत्तर देता??
