स्त्री देह
स्त्री देह
देह परमात्म्याने दिलेली अमूल्य देणं
आपल्या अस्तित्वाची जाण निरागस
आपल्या गुणांची अमूल्य अशी खाण
आपल्या श्वासांचा भरभक्कम आधार
देहरूपाने पेललेले सगळे प्रापंचिक भार
त्यातही स्त्री देह मातृत्वाच्या ऋणात भिजलेला
सजलाय सदा जगत-जननीच्या वैश्विक रूपातं
म्हणे स्त्री म्हणजे देवी स्वरूप साक्षातं
देवीच्या पूजनाला नित्य नेमाने गजरा वाहती
चालत्याबोलत्या देवीला मात्र गलिच्छ नजरा
सुशिक्षित समाजात समीकरणच निराळी स्त्री देहाची
दृष्टीस पडते वासनेची वेगळीच विकृत पातळी
वखवखलेल्या नजरा देहाचा घेती ठाव
जाणूनबुजून केलेला तो किळसवाणा स्पर्श
अनंत मरणे झेलूनही ओठी सर्वदा हास्य
सगळं समजत असूनही आम्ही मात्र मूकदर्शक
विषय असतो फक्त स्त्री देहाचा
वासनेशी संबंध नाही बालपण आणि नात्यांचा
तीच्या देहाची लख्तरं पाहता
थरकापच उडाला
कुठे मांडाव्या संतप्त मनाच्या वेदना?
कि फक्त दाखवाव्या लाख मेणबत्त्या वितळलेल्या
असंख्य निर्भयांचे अस्तित्वच लागले पणाला
तीच्या देहासोबतच मनावरही झालेला बलात्कार
आयुष्यभर पुरवतो तिचा पिच्छा
सरणावरही किंमत मोजत असतो
न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत
