STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational Others

4  

Priti Dabade

Inspirational Others

सर्वधर्मसमभाव

सर्वधर्मसमभाव

1 min
261


मी उच्चजातीचा आहे सर्वश्रेष्ठ

दुसऱ्यास हिणवी तू कनिष्ठ


धर्मभाव देशाला लागलेली कीड

वाढवी आर्थिक चिंता,चिडचिड


रक्ताचे नको रस्त्यावर तांडव

रक्तदान शिबिराचे बांधूया मांडव


रक्ताचा रंग साऱ्यांचा लाल

का करायचे असे हाल


होत चालली अमानुष वृत्ती

नको बदलायला धर्मासाठी नीती


कधी होणार धर्मभेदाचा अंत

ह्याची वाटे मोठी खंत


थांबवा सारे दंगे, मारामारी

ह्यास फक्त तुम्हीआम्हीच तारी


जातीधर्माचा हा खेळ थांबवा

सर्वधर्मसमभाव भावना मनी रुजवा


घेऊ सारे एकजुटीने प्रतिज्ञा

समजूनी भारत देशाची आज्ञा


सर्वधर्मसमभाव न डळमळणारे राष्टीयत्व

त्याकरिता बाळगू अंगी तत्व


सर्व धर्मांवर प्रेम करूया

सुखाच्या वाऱ्याची आशा धरूया


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational