सरल्यावर उरतं प्रेम हे....
सरल्यावर उरतं प्रेम हे....
सरल्यावर उरतं प्रेम हे...
जणू ऋणानुबंध जपायला
एखाद्याची आठवण काढून
खूप रडवणार नाहीतर हसवणार
थांबलेलं आयुष्य जगण्यास भाग पाडणार
आलं किती गेलं किती ह्या सगळ्यांना
पुरुन उरत ते सरल्यावर उरतं प्रेम हे...
निःशब्द, अबोल, लाघवी अनेक
उपमा येथे फिक्या पडती...
प्रेमाचे तुषार शिंपित चहुकडे
मृगजळासम भास होती
रात्रंदिवस मग कोडे पडती
विरह भोगून आयुष्य सरल्यावर उरतं प्रेम हे...
कधी वरदान तर कधी शाप
होई मग आयुष्याचे मोजमाप
आयुष्य सरल्यावर उरतं प्रेम हे...

