STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance

3  

sarika k Aiwale

Romance

सर पावसाची वेडी

सर पावसाची वेडी

1 min
355

सर पावसाची जरा झालीसे वेंधळी

थेंब पावसाळी कसे आले ओघळूनी 


मेघ दाटूनी येता निळ्याशार या नभी 

मन वढाय होई ओले चिंब पावसाळी 


धारा पावसाच्या भरूनी घे ओंजळी 

मन मोरपिसि नाचते स्वछंदी अंगणी 


पाऊस धारा वाहता माझिया अंगणीत

आसवांच्या धारा वहाती या ओंजळीत


पावसाच्या या ओल्याचिंब बरसती सरी 

मनी काहूर माजाते येता आठवण ती जुनी 


बहाणे ते नित्य नवे भिजायचे मन त्यासवे 

पावसाच्या हलक्या सरी मन झुले तयासवे 


पापणीत सर भिजे आठवणीच्या ओल्या सरी

मेघाच्या मनी दाटे काहूर सर पावसाची सांगते 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance