STORYMIRROR

Prashant Shinde

Romance

3  

Prashant Shinde

Romance

स्पर्श...!

स्पर्श...!

1 min
127

स्पर्श तना मनास हा

गोड गोड वाटे मला

हिंदोळ्यावरी झुलताना

काय वाटते कसे सांगू तुला...

हिरवी पाने वाऱ्यावरी

लयीत हिंदोळे देताना

हळूच लाजतात कशी

कसे शब्दात सांगू तुला...

तिरप्या किरणांची अभा

दूरवर पाहताना

किती अप्रुप वाटते मला

कसे सांगू तुला सांग मला...

तो ढगाआडचा रवी

कान्या डोळ्यांनी पाहतो मला

चोरटी नजर त्याची

आठवण करून देते कसे सांगू तुला...

वाऱ्यासवे जाणाऱ्या पावसास

निरोप तुला देण्यास सांगितले

भिजण्यास तुझ्यासवे पुन्हा मी

भरपूर पावसाचे आंदण मागितले...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance