Prashant Kadam

Inspirational


4  

Prashant Kadam

Inspirational


स्फूर्ति

स्फूर्ति

1 min 263 1 min 263

आयुष्यात ह्या शिकण्यासारखे  

अजुन बरेच काही बाकी आहे,

बघता बघता षष्ठी सरली 

तरी अजूनही अंगी स्फूर्ति बाकी आहे.


बालपणापासून जीवनाचे  

सतत खडतर धडे गिरवले 

प्राप्त केल्या अनेक पदव्या 

तरी अजूनही खूप शिकायचे बाकी आहे.

बघता बघता षष्ठी सरली 

तरी अजूनही अंगी स्फूर्ति बाकी आहे.


तारूण्यातही तावून सलाखून

बुद्धीमत्तेची केली नियमित वृद्धी 

संस्कार कितीही अंगी बाणले 

तरी अजूनही खूप शिकायचे बाकी आहे.

बघता बघता षष्ठी सरली 

तरी अजूनही अंगी स्फूर्ति बाकी आहे.


वयाचे मुळीच नाही दडपण

बुद्धी अजूनही आहे सक्षम 

आयुष्यात ह्या शिकण्यासारखे  

अजुन बरेच काही बाकी आहे.

बघता बघता षष्ठी सरली 

तरी अजूनही अंगी स्फूर्ति बाकी आहे.


ज्ञान मिळवले सुखस॔पत्ती मिळविली 

समाधान अजूनही बाकी आहे

आयुष्यात ह्या शिकण्यासारखे  

अजुन बरेच काही बाकी आहे.

बघता बघता षष्ठी सरली 

तरी अजूनही अंगी स्फूर्ति बाकी आहे.


Rate this content
Log in

More marathi poem from Prashant Kadam

Similar marathi poem from Inspirational