STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

सोमवार सुप्रभात...!

सोमवार सुप्रभात...!

1 min
205

मनोकामना सफल होवो..!!

सो ळा सोमवारचे व्रत का करतात

म ला अजून तरी कळाले नाही

वा रा व्रतामुळे कोणता फरक

र  त्तीभर पडलेला मी अनुभवले नाही...

सु  खासीन जीवन जगण्याची लालसा

प्र यत्न करूनही साधली नाही

भा ग्यात माझ्या आजवर

त  सुभरही अभिवृद्धी अजून झाली नाही...

म  ला आता रविराजाचे

नो कर होणे मान्य नाही

का हीतरीच अपेक्षांचे ओझे वाहणे

म नापासून आवडत नाही आणि त्याचे

ना  टक करणे योग्यही वाटत नाही...

स  काळी सकाळी चार ओळी लिहिणे

फ ळास यावे असे मनात घाटते

ल  टक्या इच्छेची फलश्रुती

हो कारात होताना आता

वो दिन पुन्हा आले म्हणावे वाटते....!

हर हर महादेव...!सुप्रभात...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational