STORYMIRROR

Savita Jadhav

Tragedy

3  

Savita Jadhav

Tragedy

सोडून तू जाताना

सोडून तू जाताना

1 min
11.5K

काळजाच्या तुकड्याला,

जीवापाड होतं जपलं....

सोडून जात असताना तुला

काहीच कसं नाही वाटलं

ज्यांचं सारं जीवन

होतं तुझ्यातच सामावलं

सोडून त्यांना जातांना

मन नाही का भरून आले

घराच्या अंगणात

दुडूदुडू धावलं

घर सोडून जाताना तुझं

पाऊल जड नाही का झालं

तुझ्या डोळ्यातल्या आसवांना

हळूवार त्यांनी टिपलं..

अश्रू अनावर झाले त्यांना

तुझं मन त्यांच्या साठी कसं नाही रडलं

आई बाबा दैवत आपलं

ज्यांनी जीवापाड तुला जपलं

त्यांच्यासाठी काळीज तुझं

नाही का रे तडफडलं.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy