STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Tragedy

4  

Sakharam Aachrekar

Tragedy

सोडून चाललो मी

सोडून चाललो मी

1 min
233

स्वप्नवत या सुखाला, सोडून चाललो मी

जंजाळ आसवांचे, तोडून चाललो मी


जमले मला कुठे ते, विसरून भास जाणे 

ओढाळ या मनाला, ओढून चाललो मी


सांडून आसवे मी, वचने तुला दिली जी 

ते शब्द शब्द आता, खोडून चाललो मी


मी मद्य प्राशिले ना, मग कैफ ही कशाची 

काही नको नको ते, बोलून चाललो मी 


पाने अखेरची ही, उरलीत दोन पाठी 

त्यां ओळ शेवटाची, जोडून चाललो मी


देहास चुंबिले या, कित्येक वादळांनी 

त्या वादळी तुला अन, कोरून चाललो मी 


सोडून का दिले तू, मज एकट्यास मागे 

जुळणार ना असा बघ, मोडून चाललो मी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy