सोडू कशी प्रिया
सोडू कशी प्रिया
सोडू कशी प्रिया साथ तुझी
प्रेमाच्या बंधनात घट्ट आवळलेत आपण
बावरले गंधाळले प्रेम आपुले
सुखा दुःखाचे शेवटी सोबती आपण
नारीशक्ती जागृत कराया
घालू सर्वच खतपाणी
जागृतीच्या रथावर होऊन आरूढ
जुन्या चालीरीतीचे करू पाणीपाणी
मनोमनी गं साजने
असते तुझाच ध्यास
क्षणोक्षणी होते बघ
मला तुझाच आभास
आधार तुझा जगण्यासाठी
हाताची मिळावी साथ
भाग्योदय व्हावा प्रभाती
मी तुचं व्हावे, तू मीचं व्हावे
जुळो जन्मोजन्मीची नाती

