सोबती
सोबती


सांज होती सोबतीला
बोल मनातले ऐकायला
एकाकी होता चांद नभी
भेटली ती सागर किनारी
शान्त होते तारे सारे
हसरे होते तुझे बहाणे
कोवळ्या किरणातले
भास मनी या जपलेले
नक्षत्राच होत देण तू
श्वासतला तो प्राण तू
क्षितिजावर जे लिहिल
ते चित्रकाव्य असे तू
गहिरी होते रात्र जेव्हा
बहरात असते पोर्णिमा
त्या साथीला दुरावते
मन ते आणिक झुरते
तू फक्त माझाच आहेस
क्षितिजावर ही ते नाव कोरते
मन कधी तुझ कधी माझ
क्षितिजात ही विश्वास कायम
संपलेले ते भाव तू
राहिलेले ते जगण तू
उरली संध्या ती एकाकी
मी तिचीच कायम सोबती