संविधान
संविधान
समाज सुधारण्यासाठी,
जीवाचे केलेस तू रान.
जातभेद, बंधुता, समतेचा,
ठेवून जनहितार्थ भान.
माणूस म्हणून जगण्याचा,
जागविला स्वाभिमान.
सखोल ज्ञानातून निर्मिले,
अमर भारतीय संविधान.
दिनदलितांच्या हक्कासाठी,
न्याय देण्यासाठीच लढला.
गोरगरिबांचा आधारासाठी,
स्वतः सेतू होत,जीवन जगला.
सामान्य समानतेच्या दर्जासाठी,
देह बाबासाहेबांनी झिजवला.
शिक्षणाकडून प्रकाशाकडे,
जाण्याची शिकवली कला.
आसवांचा सागर खळखळला,
घटनाकाराने अखेरचा श्वास घेतला.
महामानव अनंतात विलीन झाला,
दिनदलितांचि जीव तळमळला.
