संवाद
संवाद
सख्या तुला पाहूनीया
शब्द ओठात गोठते
नजरेस नजर ही
अबोलातुनी भिडते
शब्द तुझ्यासाठी आज
वेचूनिया ठेवले मी
समोर तू आल्यावर
जाते भान विसरुनी
धडधड वाढे माझी
बोलण्या शब्दांची घाई
मनातल्या ह्या भावना
हृदयात परत जाई
होई देवाण-घेवाण
नजरांची नजरांशी
शब्द तसेच राहता
होई संवाद मनाशी
समजून घेते सख्या
भाव मनातले तुझे
न बोलताही शब्दांना
पोहोचवी भाव माझे

