Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sangita Pawar

Inspirational

3  

Sangita Pawar

Inspirational

संत मुक्ताबाई

संत मुक्ताबाई

1 min
242


सर्व महिला संतांमध्ये 

संत मुक्ताबाई महान

होऊनी संत कवियत्री

वाढवी महाराष्ट्राची शान ||


योग सामर्थ्याची जाण

बनुनी भावंडाची माई

अस्मिता ,स्वाभिमान

 सजीव रूप मुक्ताबाई ||


समाज प्रबोधनात थोर

मोठा लावला हातभार

होत्या अशा संत खास

'ज्ञानबोधाच्या' लेखनकार ||


स्वतःच्या व्यक्तिमत्त्वासाठी

रचिले ताटीचे अभंग

देऊनी बोध ज्ञानेश्वरांना

'योगी चांगदेवामध्ये' दंग ||


मुक्ताबाईच्या काव्यात

साक्षात्काराचे पडसाद

जीवन, प्रतिभेचे पैलू

असे अभंगाचा नाद ||


वात्सल्याने सावरले भावा

देऊनी भावंडांना छाया

जागरूकतेसाठी फटकारूनी

सुखदुःखात घालविली काया||


आयुष्यातील मोठा प्रसंग

विसोबा खेचर यांचे शरण

खानदेशी तापी नदीकाठी

समाधिस्त होऊनी मरण ||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational