संत गाडगेबाबा जयंती
संत गाडगेबाबा जयंती
वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा
समाज परिवर्तन व प्रबोधनाचा कणा
अशिक्षित, अंधश्रद्धा, अपसमजाचा
नाही काढु दिला फणा !
अखंड आयुष्य हाती झाडु घेऊन
स्वच्छतेचा महामंत्र दिला.!
नव्हती शाळेची चढली पायरी
पण अज्ञान, भोळ्या समजुती,
अनिष्ट रुढी विरुद्ध लढा दिला.!
२३ फेब्रुवारी १८७६ रोजी
अमरावती जिल्ह्य़ातील शेडगावी
या संत महात्म्यांचा जन्म झाला
केले भजन- कीर्तनातून समाज प्रबोधन
समाजप्रबोधनाचा व शिक्षणाचा
नवा कानमंत्र दिला.!
शिकवण माणुसकीची दिली
शाळा नव्हती नशीबी
विज्ञाननिष्ठ भुमिका बजाविली
या संताची समाजाला दिसली खूबी.!
नमन करावे या संताला
कोटी कोटी प्रणाम करुया!
अमरावती विद्यापीठास दिले नाव बाबांचे
नतमस्तक या संतास होऊया.!
सर्व माझ्या सारस्वत बंधु भगिनींना संत गाडगेबाबा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा