नका नेऊ वृद्धाश्रमी...
नका नेऊ वृद्धाश्रमी...
लेकरा झालो का मी जड
तुम्हाला सांभाळायाला
का चाललास घेऊन
तू मला वृद्धाश्रमाला...
तळहाताच्या फोडावानी
जपले तूला लहानपणी
फेडतोस का हेच पांग
आता माझ्या म्हातारपणी...
केला होता मी विचार
होशील तू म्हाताऱ्याची काठी
तू तर घातले घाव ह्रदयी
झेलले मी वार पाठीशी...
ज्या बोटाला पकडून
दाखविली मी शाळेची वाट
आली वेळ माझे बोट पकडण्याची
तर वृद्धाश्रमाचा घातलास तू घाट...
सांभाळण्याची आईवडिलांना
प्रत्येक मुलाला दे बुद्धी देवा
नका नेऊ म्हाताऱ्यांना वृद्धाश्रमी
आजन्म असावी मुलांची साथ देवा...