Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vrushali Khadye

Inspirational

4  

Vrushali Khadye

Inspirational

"सोड सोड तंबाखू"

"सोड सोड तंबाखू"

1 min
418


तुला रे कितीदा सांगायचे रे 

तुला रे कितीदा सांगायचे...||धृ||


कितीदा हाती तू तंबाखू घेतोस

चुना लावून त्याला मळतोस

तोंडात ठेवून चघळतोस रे

तुला रे कितीदा सांगायचे...||१||


तंबाखूत आहे विषारी निकोटीन

तुझ्या शरीरात जाते ते लाळेतून

कॅन्सरचा धोका ओळख तू रे

तुला रे कितीदा सांगायचे...||२||


ह्रदय,फुफ्फुसे,ओठ अन् दात

अवयवांची या अनमोल किंमत

अवयव निकामी होतील की रे

तुला रे कितीदा सांगायचे...||३||


तंबाखू खाऊन पचकन थुंकतोस 

भिंती,रस्ते लाल लाल करतोस

सौंदर्य त्यांचे तू बिघडवतोस रे

तुला रे कितीदा सांगायचे....||४||


सिगारेट,चिलीम,तपकीर,विडी

तंबाखूचीच तर ही नवी पिढी

धूम्रपानातही तंबाखूच की रे

तुला रे कितीदा सांगायचे...||५||


तंबाखूचे व्यसन शरीराला घातक

आयुष्य बरबादीचे लागेल पातक

तंबाखूविन सुंदर जीवन जग रे

तुला रे कितीदा सांगायचे....||६||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational