STORYMIRROR

Mrunali Kalbut

Inspirational

4  

Mrunali Kalbut

Inspirational

आत्मविश्वास

आत्मविश्वास

1 min
894

एका हृदयस्पंदनात अस्पष्ट श्वास शोधणारा

आणि त्या श्वासात विलीन होणारा,

शिरांच्या वेढ्यात जगण्याची दोरी ओवणारा

आणि निराशांच्या जगण्याचे अस्तित्व पुसणारा,

दगड झालेल्यात जीवनाचे ठोके पेरणारा

आणि त्याच्या बहरण्याची उमेद खुलवणारा ,

मिटलेल्या डोळ्यांना सोनेरी स्वप्न देणारा

आणि स्वतः त्या पहाटेचा सूर्य होणारा,

किरणांच्या रूपात रोमरोमात संचारणारा

आणि अजून शेवट झाला नाही कारण

मी माझ्यात बाकी आहे ही ग्वाही देणारा !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational