जिद्द
जिद्द
भणंग म्हणून कशी
करु आयुष्य हेटाळणी
संघर्ष हेच जीवन
कधी चालू अनवाणी
वाट सारीच ही थोडी
असे फुलं सजलेली
क्षणी बोचतील काटे
त्यांना सोसुत सुखांनी
संघर्ष..........
छाया मायेच्या पदराची
नित्य देईल सावली
कशी डगमगू देई?
आम्हा थोरा शिकवणी
संघर्ष...........
नवं करण्याची जिद्द
कशी सोडून चालेल
घडे मनासव काही
कसे जावोत भुलोनी
संघर्ष...........
गुरुजन माय-बाप
सारे दाखवाया वाट
गाठ शिखर यशाचे
दिले आशिष तयांनी
संघर्ष हेच जीवन
कधी चालू अनवाणी...........
