STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

4  

Meenakshi Kilawat

Inspirational

स्त्री तुझा हक्क

स्त्री तुझा हक्क

1 min
459

जाहीर का करत नाहीस गं

सखी तू कर विद्रोह मनस्वी

भोग भोगू नकोस तू जीवंतपणी

स्त्री तुझा हक्क सदा सर्वस्वी।।


स्त्री जातीला मिळालाय हक्क

ओलांड आता तू घराचा उंबरठा

स्वत: मात्र घेतला नाही तू लाभ

उचलला संसाराकरीता भार मोठा।।


निरागस स्त्रियांच्या अस्तित्वासाठी

ज्वलंत ज्योत घे तू हातात

ही ज्योती जाळूनी सुमेधा

पसरव या पूर्ण त्रिभूवनात।।


युक्तीने अन् शक्तीने दाखवी

आपली चुणूक संसारपथावर

कर मनापासून निग्रह अन्

रचूनी वीर गाथा कर्तृत्वावर।।


सक्षम होवूनी स्वबळावरती

देती उद्योग नवनिर्मितीचे वाण

स्त्रीविना घर स्मशानासम

स्त्री तुझा हक्क आहे गं महान।।


स्त्री भ्रूण हत्येचा निषेध कर

मिळूनी अन् ठणकावूनी

समस्त स्त्रिया साक्षर करण्या

मनात गाठ ठेव मारूनी।।


स्त्री तू अबला नव्हे आहे सबला

लक्ष्मीबाई मॉं जिजाऊंचा मान

सावित्रीबाई, अहिल्याबाईची लेक

स्त्री तुझ्या कार्याचा सर्वां अभिमान।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational