STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Others

4  

Sakharam Aachrekar

Others

सलाम सैनिका

सलाम सैनिका

1 min
169

धगधगणारा सूर्य असू दे, वा बर्फाची शाल

कौतुक तुझे रे सदैव सैनिका, ना डगमगली तव चाल

लढलास घेऊनी हाती, ज्वलंत क्रांतीची मशाल

झेलण्यास वार गनिमाचे, केलीस छातीची ढाल


समर्पित या मातृभूमीला, एकेक तुझा हा श्वास

जनन मरण तुझे भारतभूपरी, अदभुत तुझा रे ध्यास

करण्या ही कर्तव्यपूर्ती सोडलीस, परिवाराची साथ

उंचावलास सदैव तिरंगा देऊन, क्रांतीवीरांना साद


आहेस तू या भूमीचा, कणखर सुपुत्र वीर

कर्तव्यापरी राहतोस रे स्वतःपासूनही दूर 

का होतो तुला बिलगण्या, मृत्यू ही आतुर

विचारात या होतोय बघ तो, तिरंगा चिंताचूर


ठेव ध्यानी परिवार तुझाही, वसे कोण्या नगरी

विचार पडतो तुझ्या नशीबी, अंधार असा का लहरी

उठती शहारे अन येती आसवे दाटून या अंतरी

सलाम करतो तुला मनातून, तुझ्या देशप्रेमापरी


Rate this content
Log in