STORYMIRROR

Jyoti gosavi

Inspirational Others

4  

Jyoti gosavi

Inspirational Others

संस्कृतीचा कणा

संस्कृतीचा कणा

1 min
428

तांबड्या मातीत 

घुमणारा हुंकार

ठोकलेला शड्ड्

घुमलेला टणत्कार


कटाची आमटी आणि

 पुरणाची पोळी

बैलाला ढोल म्हटलं की

समजायचं आली होळी



काळ्या वाटाण्याची उसळ

शेवग्याच्या पाल्याची भाजी

दही पोह्याची शिदोरी

दुधापेक्षा कन्हैया यावरच राजी


दशावताराची नशा

, गावोगावचे तमाशे

पाडव्याची शोभायात्रा

गणपतीचे ढोल ताशे


 कोणी मागितले तर 

देऊ कासेची लंगोटी

का रे म्हणणार्र्याच्या

डोक्यामध्ये घालू काठी


व जरा होणे कठीण

 लोण्याहुनी मऊ 

पेटलो तर कर्दनकाळ

नाहीतर सारेच भाऊ


आमच्या नसानसात 

भिनला आहे

शिवाजी संभाजी 

तानाजी आणि बाजी

झुंजार पडेपर्यंत झुंजतो

पण हारत नाही बाजी


कलासक्त ही आम्ही 

कलाकारहीआम्ही 

 नाटके साहित्यसंमेलने

 दिवाळीचे अंक 

कोठेच नाही कमी


मोडेल पण वाकणार नाही 

आमचा मराठी बाणा

कदाचित असेल उणा

पण हाच आमच्या

 संस्कृतीचा कणा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational