STORYMIRROR

Meera Mahendrakar

Tragedy

3  

Meera Mahendrakar

Tragedy

संशोधन

संशोधन

1 min
122

 विज्ञान युग आले आहे आज जगात          

परंतु आशावादी जगण्यासाठी संशोधन हवे


 चांगल्या गोष्टीचे ज्ञान आहे माणसाकडे           

चांगुलपणा टिकवण्यासाठी संशोधन हवे 


प्रामाणिकपणाचे महत्व समजते सगळ्यांना           

ते सातत्याने जपण्यावर संशोधन हवे


पोटभर दोन वेळेचे प्रत्येकाला जेवण मिळावे      

कोणीच उपाशी नसावे यासाठी संशोधन हवे


परोपकार माहित असते प्रत्येकाला      

मदतीचे संस्कार रुजवण्यासाठी संशोधन हवे 


गरीबी नको असते कुणालाच       

कायमचा हा प्रश्न मिटवण्यावर संशोधन हवे


सेवाभावाची जाणीव असते समाजाला        

परंतु ही वृत्ती जगवण्यासाठी संशोधन हवे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy