संसाराच्या वेलीवर
संसाराच्या वेलीवर
नाते असते जन्मातंरीचे
अवलंबून पती पत्नीवर
प्रीत त्यांची फुलत असते
छान संसाराच्या वेलीवर..!
संसार असावा दोघांचा
पती हा पाया कुटूबांचा
एकमेकांचा हात धरून
संसार करावा सुखाचा..!
पती पत्नीची वागणूक
असावी नेहमी प्रामाणिक
तेव्हाच संसाराच्या वेलीवर
टिकणार दोघांचंप्रतीक..!
सुख-दुःखाची साथीदार
असते आपली अर्धांगिनि
तीच्यामुळे सुखाचे दिवस
येतात प्रत्येकाच्या जीवनी..!
संसाराच्या वेलीला पत्नी
नेहमी फुलवतच राहते
तिच्यामुळेच आपल्या
घरालासुद्धा घरपण येते..!
