Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Jinturkar

Abstract

4.6  

Sarika Jinturkar

Abstract

संसार

संसार

1 min
237


👩‍❤️‍👨👫


 दोन जीवांचा जोडीने प्रवास  

कधी होतात दोघांचे एकमेकांशी संवाद

 तर कधी होतात प्रेमळ वाद  


हा खेळ नशिबाचा ऊन-पावसाचा

 सहसंवेदना, अनुभव आपापले 

तरी दोघांच्या वेगवेगळ्या भावना  

कधी भासतो हा संसार सुखाचा 

तर कधी दुःखाचा


 संकटी जे धावती त्यास कुटुंब म्हणती  

रुसवा-फुगवा यांना न देता जागा

 एकमेकांना सावरून घेत न सुटणारा

 गुंफण ठेवण प्रेमाचा धागा 

त्यालाच तर संसार म्हणती...  


कधी चुकायचं कधी चुकीतून शिकायचं  

 प्रत्येकाला समजून घेत जबाबदारी 

पूर्ण कार्य पार पाडायचं😊 


कुटुंबासाठी आपण आपल्यासाठी कुटुंब  

जीवनाचं खरं सार समजुन 

आयुष्य आनंदाने जगायचं☺️ 

  

संसारात सगळ्यांच सुख

 म्हणजेच आपलं सुख मानायचं

 नात्याला वाऱ्यासारखे जपायचं जरी दिसत नसला तरी मायेची उब ठेवून शब्दात वर्णता नाही 

येणार एवढं आपुलकीने जपायचं 

 

कितीही असले गैरसमज तरी शेवटपर्यंत नव्या सारखं विश्वासाची साथ सदैव मनात ठेवून ते टिकवायचं

एकमेकांच्या सानिध्यात स्वतःचं घर,कुटुंब

 प्रत्येक प्रसंगात जपायचं  


तुझं माझं न करता आपलं म्हणून

 भूतकाळात रमायच आणि वर्तमानात जगायचं🤗 


एकमेकांना सर्व त्रुटी सह स्वीकारायचं 

एकमेकांना सुख-दुःखात साथ देत

 परकेपणा नाकारून  

एकजण चिडला तर दुसऱ्यांनी

 शांत राहायचं  

नात्याची वीण सुटू न देता नात 

अलगदपणे सावरायचं  


 स्वतःचं अस्तित्व विसरून 

समोरच्याचा होऊन जायचं 

आयुष्यभरासाठी एका नात्यात स्वतःला पूर्णपणे झोकून द्यायचं 

असाच संसाररथ पुढे नेत सुख-दुःखात 

ही गुलाबा सारखा रुबाब  

ठेवत काट्यात सुद्धा फुलायचं...


  संसार दोन जीवांचा जोडीने प्रवास 

 माझं म्हणून नाही आपलं म्हणून  

जगता आलं तर आयुष्यात सदैव 

नांदेल सुख-समृद्धी  

आणि मनी राहील जीवन जगण्याची आस...🙏😊


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract