संसार सागर
संसार सागर
संसार संसार । भवाचा सागर ।।
दुःखाचे आगर । जीवासाठी ।।१।।
काम, क्रोध, लोभ । नरकाचे द्वार ।।
मोह, अहंकार । मत्सरही ।।२।।
सुख आणि दुःख । जीवनाचे भोग ।।
एक भवरोग । छळतसे ।।३।।
संसारात गुंग । देव विसरला ।।
कसा आठवला । दुःख येता ।। ४।।
संसाराचा रथ । ओढावा जोडीनं ।।
जगावे गोडीनं । प्रेमभरे ।।५।।
संसार रथाला । प्रेमाचे वंगण ।।
फुलते अंगण । वृन्दावन ।।६।।