संपला नाही प्रवास..
संपला नाही प्रवास..
संपला नाही प्रवास..
किती असतात नाही प्रश्न
उत्तर फक्त शांत राहणे
संपली जरी सहन शक्ती
तरी संपला नाही प्रवास
वाट बिकट खडतर तरी
रुक्ष जीवन असे जरी
रुतुपरत्वे बदलती सारे
रंग नभीचे वा जगीचे
संपणार च आहे जीवनगाथा
कर्तुत्वाला चुकवा कशाला??
मान्य नसे कोणी समजत
असे लेखणी हाती जर
करत जा रिकाम मनाला
उतरवत जा कावितेला
रखरखित वाळवंट ही
वाटेल क्षणभर सुखद
संध्या समयी ची छाया
लाभेल गारवाही मनीला
