STORYMIRROR

harshada joshi

Abstract Tragedy

4  

harshada joshi

Abstract Tragedy

सणांची किमया

सणांची किमया

1 min
475

प्रत्येक सणाला असते 

आमच्याकडे आनंदाची मांदियाळी 

डोळ्याचे पारणे फेडणारा 

आवडे सणांचा राजा दिवाळी 


अथपासून इतिपर्यन्त 

असते गोडाची साठवण 

माझ्या गावाकडच्या वाड्यात 

लपली आप्तांची आठवण 


ओसाड पडल्या ओसरीत 

आजही ती कण्हती 

काँक्रीटवरच्या भिंतीवरची 

शोभा वाढवते ती पणती


शिक्षणाने लागले नात्याला 

शहरीकरणाचे वारे 

तोडले तरी कोणी 

माझ्या आठवणींचे धागेदोरे ?


आठवतो कटाच्या आमटीचा तवंग 

जिभेवर अजूनही रेंगाळते 

पुरणपोळी खमंग 

झाली मनामनाची फाळणी की

नात्यातला हा वंगभंग ....??


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract