सण दिवाळीचा ...
सण दिवाळीचा ...
उत्सवाचा पुर ,
दिवाळीचा सुर ,
अभ्यंगाची भोर ,
परसात मोर ...
अंगणात चांदणे ,
टिमटिमते उंबरठे ,
लक्ष्मीला आवाहने ,
सौख्याचे साठे ...
गारवा शिंपते ,
आनंद उसळते ,
नाते जुळते ,
मनाने बांधते ...
सण दिवाळीचा ,
गाय वासराचा ,
बंध भावकीचा,
पती पत्नीचा ...
आली दिवाळी ,
दिव्याची रांगोळी ,
कौतुक सकाळी ,
प्रकाशरंग उधळी ...
