संक्रांती पहाट
संक्रांती पहाट
नव्याने आज तिच पहाट उजाडली
संक्रांतीची संक्रमणे जीवनी ल्यावी
लकेर दु:खाची ती हलकेच मावळली
उब मायेची पापणीतुनी जिवंत व्हावी
सुखाच्या बरसातीत आस ती भिजलेली
सय कोरडी ना अंतरी जवळीक ल्यावी
संक्रांती पुरवणी तीनाती गोती जपलेली
न शब्दागणिक तिळ गुळाची गोडी खावी
जीवा असूया न व्हावी पहाट ती वेगळाली
दिन सोनियाचा लेऊनी चकोर ती खुलावी

